चांगल
बरेच जण ट्रॅकवरुन क्रॉस करतात
पण काहीजण तरी पुलाचा वापर करतात
हे चांगल आहे ...........
बरेच जण आयुष्यात ट्रॅक सोडतात
पण काही जण कायम ट्रॅकवर असतात
हे चांगल आहे ..........
बरेच मनुष्य प्राण्यासारख जगतात
पण काही मानव असण्याच सार्थक करतात
हे चांगल आहे .......
वासनेच्या गर्तेत कितीक आहेत , असतील
पण स्त्रीशी माणूस म्हणून वागणारे पण आहेत
हे चांगल आहे ............
जीवन नुसत संपवणारे अनेक असतील
जगण सार्थ करणारे कोणीतरी असतील
हे चांगल आहे .........
मागच्या पानावरुन पुढे हे चालूच राहील
पण रोज नवीन पान कांही
लिहितील
हे चांगल आहे ..........
दुसऱ्याला दुःख देणारे कैक आहेत, पण
आपल दुःख लपवून दुसऱ्याला हसवण
हे चांगल आहे ..........
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment