भोग आणि ईश्वर भाग ६५६ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले सूक्ष्म देह हा, स्थूल देहात प्रवेश केल्यावर, गर्भात असताना, कोणत्याही बाह्य गोष्टींचा परिणाम किंवा कोणत्याही बाह्य विषयाशी संबंध आलेला नसतो. त्यावेळी तो शुद्ध स्वरूपात असतो आणि आपल्या आधीच्या कर्मांची माहिती असल्यामुळे, ईश्वराची क्षमायाचना करून, केलेल्या चुकांचं आणि अपराधांचं परिमार्जन करण्याच्या आणाभाका घेत असतं. कारण मृत्यू पश्चात आत्म्यासह गेलेल्या सूक्ष्म देहाला गत जन्मातील गोष्टींचं स्मरण असतं. हे स्मरण स्थूल देहात असताना, देहाच्या मर्यादेमुळे विस्मृतीत गेलेलं असतं. म्हणजेच गर्भात तेच स्मरण शिल्लक असतं. पण गर्भरुपातून, बाह्य जगतात येताच, पुन्हा विस्मृतीचा पडदा पडतो. अर्थातच याला देहाच्या, ज्ञानेंद्रियांच्या, कर्मेंद्रियांच्या मर्यादा कारणीभूत आहेत. एकदा बाहेर आलेला बालक या जगताचा होईपर्यंत त्या स्मृती शिल्लक असतात. पण जसजसा देह वाढत जातो. सूक्ष्म देहाला या जगाच्या मर्यादांचा, मायेचा, अतृप्त इच्छा वासना, इत्यादी सहा शत्रूंचा पाश वेधून टाकतो. त्या क्षणापासून तो जीव गत जन्मातील कर्मांचा हिशोब विसरून, प्राप्त देहाच्...
भोग आणि ईश्वर भाग ६५५ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले सूक्ष्म देह आणि स्थूल देह या दोन्हींनी कर्म होतात हे आपण पाहिलं. पण प्रत्यक्षात सूक्ष्म देह इच्छा, वासना, क्रोध, इत्यादी. भाव निर्माण करतो. पण त्यांचं शमन हे स्थूल देहा मार्फतच होतं. त्या अर्थाने सर्व कर्म ही स्थूल देहाने केलेली असल्यामुळे, खरंतर फलरूप शिक्षा किंवा बक्षीस हे त्या देहालाच व्हायला हवंय. पण प्रत्यक्षात जी कर्म फलरूपाला पक्व होत नाहीत ती, संचित रूपात गंगाजळीत शिल्लक राहतात. हिशोबाच्या भाषेत सांगायचं झालं तर, करंट म्हणजे चालू काळाची व संचितातील परिपक्व फळांची देणी व घेणी चालू काळात वसूल होऊन, ते चालू काळात (अर्थात सध्याच्या जन्मात) भोग व उपभोग रूपात समोर येतात. त्याचं नफातोटा पत्रक म्हणजे आपलं या देहातील, या जन्मातील जीवन. जे भोगून होणार नाही किंवा अपूर्ण अथवा अपरिपक्व फल असेल ते पुढील जन्मासाठी संचित स्वरूपात ताळेबंदात शिल्लक राहील. ते सूक्ष्म देहात साठवून आत्मा, शरीर सोडताना पुढील जन्मासाठी घेऊन जाईल. आता प्रश्न तरीही अनुत्तरित राहतो की, जर सर्व भाव भावना सूक्ष्म देहातील मन बुद्धी चित्त आणि अहंकार...