Skip to main content

ऑपरेशन सिंदूर ३

रणनीती, युक्ती आणि मोदी, Try and understand !! 

सर्वात प्रथम  मला सुद्धा घरी आपल्यावर ही बातमी समजली. मग शांत बसून विचार केला, त्यावेळी जे सर्व लक्षात आलं, ते खाली मांडतो. पटल्यास पुढे पाठवा. 

एक लक्षात घ्या की सध्यासाठी मिलिटरी ऍक्शन थांबवण्यात आलेली आहे. त्यासाठी विनंती पाकिस्तानी पंतप्रधान यांनी अमेरिकेच्या माध्यमातून केली. पाकच्या संसदेत त्यांनी केलेल्या भाषणात भारताची मिलिटरी पॉवर, संपूर्ण जगत भारताच्या बाजूने असल्याची गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली आहे. क्लिप कॉमेंट मधे पोस्ट केली आहे. 

दुसरी गोष्ट, अत्यंत दर्पोक्तीपूर्ण भाषा आणि कृती करणाऱ्या पाकला फक्त 2 दिवसात वठणीवर आणून, गुडघ्यावर आणून उभं केलं आहे. सध्या फक्त मिलिटरी ऍक्शन थांबली आहे. पण या युद्धाबंधीच्या अटी आणि शर्ती काय असतील, हे आता भारत ठरवणार. 

इथेच खरी रणनीती आणि इतिहासाची पुनरावृत्ती न होण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वावर आहे. त्याबाबत मोदी खूप सक्षम, कणखर व दृष्टे आहेत आणि तितकेच बुद्धिमान  सुद्धा आहेत, यात शंका नाही. इथे एकच उदाहरण देतो, 370 रद्दबादल करताना, त्याला सर्व बाजूंनी कायमस्वरूपी सील करण्यात आलं. त्यामुळे मोदी काय अटी आणि शर्ती ठरवतात, ते बघावं लागेल. कारण सध्या भारताची बाजू यात दमदार आहे. अमेरिकेला भारताला समजावताना काय नाकदुऱ्या काढाव्या लागल्या असतील, ते मोदी आणि ट्रम्पच जाणोत. 

पण आपली मिलिटरी तयारी, शस्त्र आणि तंत्रज्ञान यांची प्रचंड ताकद, भारताने जगाला दाखवून दिली. अमेरिकेची F16, चीनची J 17, AQ-9 , तुर्कीचे ड्रोन या सर्वांचा फोलपणा आणि कमजोरी, संपूर्ण जगाला दाखवण्यात भारतीय लष्कर यशस्वी झालं. त्या सर्वांना पाचोळ्या प्रमाणे नष्ट केलं. यात भारतीय बनावटीची शस्त्र, रशियन बनावटीची संरक्षण प्रणाली आणि इस्राईल बनावटीचे ड्रोन यांनी आपली कामगिरी आणि ताकद अमेरिका, चीन, तुर्कस्थान, अश्या अनेक शस्त्रास्त्र तयार करणाऱ्या देशांसह जगाला दाखवून आणि सिद्ध केलं की, आता जगात भारत, रशिया, इस्राईल हे तीन मुख्य शस्त्रास्त्र निर्माते आणि निर्यातक असतील. The whole weaponary game has changed in favour of india. 

अमेरिका आणि चीन यांच्या सुपर पॉवर पदाला खूप मोठा सुरुंग भारत, रशिया आणि इस्राईल यांनी लावला. हे दोन दिवसातील युद्ध ही जगाला भारताच्या प्रचंड आत्मशक्ती, मिलिटरी शक्ती, तंत्रज्ञान आणि ते चालवण्यासाठी लागणारा जिगर याची सार्थ ओळख जगाला दाखवून दिलं आहे, अर्थात demonstrate केलं आहे. अमेरिकेची सर्वात मोठी पंचाईत झाली ती अशी की, आजपर्यंत जगातील सुपर मिलिटरी पॉवर या त्यांच्या किताबाला मोदींनी लिलया हात घालून, ती खुर्ची सहजी काढून घेतली आहे. 

आर्थिक ताकद म्हणून भारत चवथ्या तिसऱ्या स्थानावर कधी जाईल, तेंव्हा जाऊदे. पण आज जगातील सर्वात मोठी लष्करी आणि राजकीय  सुपर पॉवर म्हणून भारताचं नाव, कोरण्याची चालून आलेली संधी, मोदींनी पूर्ण यशस्वी करून दाखवली आहे, याचा सार्थ अभिमान बाळगा. POK, बलुचिस्तान यासारखे विषय आता भारत आपल्या दमदार ताकदीच्या जोरावर लीलया आपल्या अटींवर घडवून आणेल. युद्धातून काय हाती आलं, याचा विचार करताना, आपल्या मनात असलेल्या अपेक्षांपेक्षा सुद्धा, देशाच्या शिरपेचात मोदींनी खोवलेला मानाचा तुरा, जगात भारतच सुपर मिलिटरी पॉवर म्हणून स्थापित करता झाला, याचा मनमुराद आनंद घ्यावा. 

अजून एक गोष्ट जी भारताने या युद्धात दाखवून, जगात आपणच सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवून देताना, एक नवा अध्याय सुद्धा लिहिला आहे. या दोन दिवसातील सर्व युद्ध कारवाई AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर घडवली. कुठल्याही मानवी शक्तीचा प्रत्यक्ष वापर न करता, फक्त आकाश आणि S - 400 या दोन्हीच्याच जोरावर पाकचे सर्व डावपेच उधळून लावले आणि त्याचं जोरावर पाकचं प्रचंड आर्थिक आणि लष्करी नुकसान घडवून आणलं आहे. यातून सावरायला पाकला 5, 10 वर्ष सहज जातील. 

दुसरं नुकसान म्हणजे आतंकवादी अड्डे, त्यांची infrastructure व्यवस्था या सर्वांना भयंकर नुकसान पोचवण्यात आलेलं आहे. आता त्यावर भारत आपलं पाहणी आणि नियंत्रण नक्कीच ठेवेल. त्यासाठी पाकला आपल्या देशातही सर्व जागा भारताला दाखवायचं लागतील, तेसुद्धा प्रत्येक ठराविक काळाने. तिसरं म्हणजे आता 12 तारखेला पुढील बैठकीत आपण जेते म्हणून बसू आणि आपल्या सर्व अटी धर्तीवर पाकला नमावं, झुकावं आणि ऐकावं लागेल. सध्या आपण मोदी पाकला कसे आपल्या दोरीत बांधतात आणि माकडा प्रमाणे नाचवतात ते बघण्यात मजा येईल. त्याची वाट पाहूया. 

एक मोठा विजय, युद्धाशिवाय मिळाला आहे आणि आपली लष्करी, राजकीय क्षमता जगात सिद्ध झाली आहे, ते सुद्धा एक इंच पुढे न सरकता. 

मोदी आज जगन्मान्य नेते झालेत, हे नक्की. !! 

©® संकल्पना आणि लेखन:  प्रसन्न आठवले 
9049353809
9960762179
१०/०५/२०२५.

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...