दोन दिवसात गुढग्यावर आणले. भारताची शक्ती !!
गेल्या दोन दिवसातील प्रत्यक्ष युद्धाची नुसती चाहूल लागताच आणि भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तराने पाकचं अर्ध कंबरडं मोडल्याचं पहायला मिळत आहे. पण त्यामागे प्रचंड शांत, संयत भारतीय पंतप्रधान मोदींनी, गेल्या दोन दिवसात ज्या प्रकारे शक्ती, युक्ती आणि धडाका चालवला आहे, त्यावरून त्या चेहऱ्यामागे किती गंभीर, गूढ, प्रखर तेज, प्रचंड बुद्धिमत्ता पण तितकाच शांत मेंदू असलेलं व्यक्तित्व लपलेलं आहे, याचा प्रत्यय सुद्धा आता जग घेत आहे. जगातील सर्वात शक्तिमान, बुद्धिमान आणि संयत राजकीय नेतृत्व आज जर कोण असेल तर, ते फक्त आणि फक्त नरेंद्र दामोदरदास मोदी, या मानवी देहातील अद्वितीय व्यक्तीत पहायला मिळेल.
अकरा वर्ष त्या माणसाने इतका संयम ठेवला, तो का ठेवला आणि भारताला आर्थिक, राजकीय, विदेशी, संरक्षण व्यवस्था, या सर्वच क्षेत्रात अशा उंचीवर का नेऊन ठेवलय, याचं उत्तर सध्या गेल्या दोन दिवसात मिळालं असं मी छातीठोकपणे सांगू शकतो. आमच्या पाठिंब्याची, मतांची किंमत या दोनच दिवसात पूर्ण वसूल झाली. बाकी जे मिळालं ते बोनस समजू. अत्यंत शांतपणे मोदीजी आपल्या लक्ष्याच्या दिशेने, अविचालपणे, पण तितक्याच आत्मविश्वासाने का एकमार्गी जात होते, ते सर्व आज लक्षात येतंय.
देशाला सर्वात प्रथम त्यांनी आर्थिक आणि संरक्षण या दोन क्षेत्रात आणि दळणवळण व्यवस्था अर्थात infrastructure या मधे, कोणत्याही विरोधाला न जुमानता पुढे नेलं आहे. विरोधाची अनेक वादळं या उत्तुंग व्यक्तिमत्वाने लीलया आपल्या स्वतःच्या अंगावर घेतली. जसा हनुमंताला आपल्या क्षमतेवर आणि उद्देशावर पूर्ण विश्वास असतो आणि जगातील कोणत्याही शक्तीला सहजी परास्त करू शकतो, हे हनुमंताला ज्ञात असतं.
त्याचप्रमाणे अनेक वावटळी, वादळं, त्सुनामी, महाप्रचंड लाटा, मोदीजींनी आपल्या प्रचंड आत्मशक्तीने, आपल्या मनाच्या महाबळाने थोपवून धरलीच, पण त्याची झळ भारतीय जनतेपर्यंत पोचू दिली नाही. ही त्या माणसाची भारतीय जनतेला खूप मोठी देणगी आहे. सर्व टीका आपल्या अंगावर घेऊन, आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा त्यापासून वाचवलं. असो.
सद्यस्थितीवर विचार करताना एक गोष्ट, जी मी मुद्दामहून गेल्या काही दिवसात नोट केली, ती म्हणजेच फक्त गेल्या काही दिवसात पाकिस्तानला फ्रस्ट्रेट करण्यासाठी अप्रत्यक्ष उपाय करत करत पाकला पूर्ण भुलवत नेलं. एखादा प्राणी किंवा व्यक्ती, तुम्हाला ज्यावेळी आव्हान देतो आणि तुम्ही ज्यावेळी त्याला आव्हान द्यायचं सोडून, शांतपणे इतर गोष्टी करता, त्यावेळी समोरचा माणूस किंवा प्राणी आपोआप मानसिक दृष्टीने कमजोर आणि खच्ची होतो. याच युक्तीचा वापर, मोदींनी पाकला, युद्धाआधीच फ्रस्ट्रेट करण्यासाठी केला.
संरक्षणातील गेल्या दहा वर्षातील तयारी आज आपल्याला किती लाभ मिळवून देत आहे, याचा प्रत्यय येतो आहे. Made in India आकाश आणि रशियन बनावटीची S- 400 ही Air Defense प्रणाली, जिने आज दीड दिवसात, काश्मीर ते गुजरात या संपूर्ण सरहद्दीच्या पट्ट्यात, कमीतकमी 100 ते 125 पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट केली आहेत. अन्यथा आधीच्या काँग्रेस राजवटीत S- 400 आणि राफेल यांच्या खरेदीचा कसा बोजवारा उडवला होता, हे आपण पाहिलं आहे.
त्यातही S- 400 भारताने रशिया कडून घेऊ नये म्हणून काँग्रेस पक्ष, व्यक्तिशः राहुल गांधी यांसह अनेक आंतरराष्ट्रीय दबाव भारतावर होतेच. राफेल बाबत सुद्धा राहुल गांधी व सर्व विरोधी पक्ष यांनी, अगदी सुप्रीम कोर्टात जाऊन त्या खरेदी विरुद्ध केसेस दाखल केल्या. पण त्यालासुद्धा सरकारने यशस्वी तोंड देऊन, सुप्रीम कोर्टाच्या कचाट्यातून राफेल डील सोडवून खरेदी घडवून, राफेल विमानं आपल्या ताफ्यात दाखल केली. आता त्यांची उपयुक्तता आणि शत्रूच्या उरात त्यांनी भरलेली धडकी आपल्याला पहायला मिळेल.
पण आपल्या संरक्षण सज्जतेत मोदी सरकार किती सक्षम आणि गंभीर होतं, याचा जिवंत प्रत्यय संपूर्ण जग आज अनुभवत आहे. भारतीय सैन्य आणि अधिकारी, वीर आहेतच, यात शंकाच नाही. पण त्या मजबूत हातात अत्याधुनिक प्रणाली आणि शस्त्रास्त्र असली की काय पराक्रम दिसतो, त्याचा परिणाम आपण दोन दिसत बघत आहोत. त्याआधी 7 मेच्या पहाटे 2 च्या सुमारास ड्रोन प्रणालीने क्षेपणास्त्र टाकून, 9 ठिकाणचे 11 अतिरेकी तळ उध्वस्त केल्यामुळे, भारत आपली संरक्षण सिद्धता आणि सक्षमता, भारत जगाला दिमाखात दाखवू शकला.
एकूण रागरंग आणि पाकचं गाळलेलं अवसान पाहता, पाक काही दिवसातच गुडघ्यावर येईल आणि नंतर नाक घासेल, असा अंदाज बांधता येतो. एकूण घटनाक्रम, मोदींचा जलवा, सिंधू नदी पासून प्रत्यक्ष सुरू झालेल्या झटापटी यातून,प्रत्यक्ष युद्धाआधीच्या राजकीय, प्रशासकीय हालचाली, तिन्ही सैन्यदल आणि प्रमुख यांचा आत्मविश्वास, शत्रूला प्रत्यक्ष युद्धाआधीच मानसिकरीत्या पराभूत करण्याचे मोदींचे राजकीय डावपेच आणि त्या मागे सुरू असलेल्या मोदींच्या थंड डोक्याच्या प्रशासकीय आणि परराष्ट्र हालचाली यातून भारताची प्रखर राजकीय जाण, बुद्धिमत्ता आणि पहिली दुसरी व तिसरी टीम तयार करण्याची मोदींची क्षमता हे देखील जगाने पाहिलं.
ते पाहून अमेरिका चीन युरोप सह अनेक देशांचे नेत्र नुसतेच विस्फारले नाहीत तर ते अवाक पण झाले. जगाने आता खरच मान्य केलं असणार, ये नया भारत है, झुकेगा नहीं. रशिया पहिल्यापासून आपल्या पाठीशी होताच आणि ठाम आहे. पण अमेरिका, इस्राईल यांनी सुद्धा पूर्ण पाठिंबा भारताच्या कोणत्याही कारवाईला दिला आहे.
नुकताच युरोप सुद्धा एकमुखाने आपल्या मागे असल्याचा ठराव त्यांनी EU मध्ये पारित केला. अगदी कालच चीनने सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन करणार नाही. हा सर्व गेल्या दोन दिवसातील घटनांनी जगाला भारताची राजकीय, संरक्षण, परराष्ट्रीय धोरणाची आणि जनतेच्या एकतेची शक्ती दाखवून दिली आहे.
त्यातून आपल्या संरक्षण सज्जतेचा प्रत्यय आलाच, पण त्या मागे असलेला योग्य राजकीय निर्णयांचा परिणाम सुद्धा पहायला नव्हे अनुभवायला मिळाला. आता एक नक्की की देश खऱ्या अर्थाने मजबूत राजकीय आणि संरक्षण - सैन्यशक्तीच्या हातात आहे. आता पाकला आपण कसाही लोळवला तरीही त्यात कुणीही दखल देणार नाही किंवा आडकाठी आणणार नाही, हे नक्की.
जय हिंद!!
जय जवान !!
हर हर महादेव!!
©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809
9960762179
०९/०५/२०२५
Comments
Post a Comment