विश्वातले सुख
विश्वातले सुख मला मिळाले तुझिया पूर्ण कृपेने
नयनमनोहर निसर्ग लाभे तुझिया पूर्ण कृपेने
विश्वातले सुख। .....
मी जर पडलो तू सावरसी
मी रडलो तर अश्रू पुससी
जर हरलो तर मनास माझ्या उंचावून तू घेणे
विश्वातले सुख ......
आयुष्याचे दान मिळाले
जन्माचे हे पुण्य फळाले
प्रारब्धाचे भोग न चुकता , भोगाया बळ देणे
विश्वातले सुख ...
पाऊल कधीही वाऊगे न पड़ो
व्यर्थ कुणाला चिंता न घडो
मन कुणाचे दुखवणे न लगे, देवा इतके करणे
विश्वातले सुख .......
भाव मनातील तुला कळू दे
चरणी मन हे लीन असू दे
तुझी कृपा ही अशीच राहो, सेवाही अर्पुन घेणे
विश्वातले सुख
:कवी : प्रसन्न आठवले
२२/१२/२०१७
११:२९
Comments
Post a Comment