ख़ास फड़के रोड प्रेमींसाठी लिहिलेली
दिवाळी पहाटेवर कविता
तरुणाईचा उत्साह आणि सळसळता जल्लोष
म्हणजेच डोंबिवली फड़के रोडची दिवाळी पहाट
दिवाळीच्या दिवसांचा आनंद आणि थाटमाट
म्हणजेच डोंबिवली फड़के रोडची दिवाळी पहाट
दिव्यांची रोषणाई आणि प्रकाशाचा झगमगाट
म्हणजेच डोंबिवली फड़के रोडची दिवाळी पहाट
रंगांची उधळण नवलाईची बहार गाती भाट
म्हणजेच डोंबिवली फड़के रोडची दिवाळी पहाट
गणेश मंदिरात दर्शनासाठी गर्दीची लाट
म्हणजेच डोंबिवली फड़के रोडची दिवाळी पहाट
कार्यक्रमाचि रेलचेल आणि सुरांची सुरावट
म्हणजेच डोंबिवली फड़के रोडची दिवाळी पहाट
मुंग्यानाही शिरायला जिथे मिळत नाही वाट
म्हणजेच डोंबिवली फड़के रोडची दिवाळी पहाट
दरवर्षी पुढील वर्षाची पाहायला लावते वाट
म्हणजेच डोंबिवली फड़के रोडची दिवाळी पहाट
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment