मधुबाला की एक अप्सरा
ईंद्राघरच्या या अप्सरेचा भूलोकी प्रवेश आजच्या दिवशी १४ फेब्रूवारी १९३३ ला घडला. नाव मुमताज जहाँ बेगम देहलवी उर्फ "मधुबाला"
आयुष्य अवघ ३७ वर्षे असूनही एकूण चित्रपट ७२. तिच्या सौंदर्या ची कीर्ती जागतिक स्तरावर पोहोचली होती आणि एक बहूमान म्हणून तिच्यावर त्याकाळचं सुप्रसिद्ध अमेरिकन मॅगझीन Theater Art मध्ये १९५२ साली "THE BIGGEST STAR IN THE WORLD AND SHE IS NOT IN BEVERLY HILLS" या शिर्षकाखाली लेख सुद्धा प्रसिद्ध झाला होता". त्यात पूर्ण पानभर फोटो देखील छापून आला होता.
तिच्या चेहऱ्यावर वयाच्या ९ व्या वर्षी १९४२ ला पहिल्यांदा रंग लागला आणि चित्रपट होता "बसंत" . तीच अप्रतिम आणि स्वर्गीय सौंदर्य आजही अनेकांना मुग्ध करत. तिच्या सौंदर्यामूळे तिच्या नावावर चित्रपट निघून त्यात काम करण्याच भाग्य तीला मिळाल आणि चित्रपट होता "मधुबाला" साल १९५०ं. सहअभिनेता अभिनय सम्राट दिलीपकूमार बरोबर असलेल्या तीच्या प्रमसंबंधाचा प्रवास निकाहाच्या चर्चेपर्यंत गेला खरा पण या प्रेमसंबंधात नया दौर चित्रपटासंदर्भातील एका कोर्ट केसमूळे आलेला दूरावा दोघांच्याही दूराभिमानामळे सांधू शकला नाही आणि ती एक शोकांतिका ठरली. तीच्या अद्वितीय सौंदर्यामूळे हॉलीवूड मध्ये होऊ घातलेला प्रवेश वडील अताऊल्लाखान यांच्या नकारामूळे प्रत्यक्षात येऊ शकला नाही. १९६० मधे तीच किशोरदांशी लग्न झालं पण हा संसार फक्त ९ वर्षच टिकला.
तीचा पहिला चित्रपट १९४२ बसंत आणि शेवटचा तीच्या मृत्युपश्चात १९७१ मध्ये प्रदर्शित झालेला पण १९५० साली चित्रीत झालेला ज्वाला आणि ही अप्सरा २३ फेब्रुवारी १९६९ या दिवशी एका दूर्धर आजारामूळे वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी भूलोकावरून ईंद्रलोकी प्रस्थान करती झाली.
शिरीष कणेकरांच्या शब्दांत तीला आदरांजली
"या अप्सरेच सौंदर्य कोमेजण्याआधीच बहुतेक ईंद्राने तिला स्वर्गात परत बोलावले असावे"
..................
आभार : विकिपिडीया
शब्दांकन व संकलन : प्रसन्न आठवले
चांगली माहीती.
ReplyDeleteहे दैवलोकीच सौंदर्यच अवघ्या 36 वर्षाच्या कालावधीत सा-या हिंदुस्तानावर पसरल आणि आजतागायत रसीकांच्या मनात राज्य करतय.
चांगली माहीती.
ReplyDeleteहे दैवलोकीच सौंदर्यच अवघ्या 36 वर्षाच्या कालावधीत सा-या हिंदुस्तानावर पसरल आणि आजतागायत रसीकांच्या मनात राज्य करतय.
धन्यवाद
Delete