Skip to main content

मधुबाला की एक अप्सरा



मधुबाला की एक अप्सरा 

ईंद्राघरच्या या अप्सरेचा भूलोकी प्रवेश आजच्या दिवशी १४ फेब्रूवारी १९३३ ला घडला. नाव मुमताज जहाँ बेगम देहलवी उर्फ "मधुबाला" 

आयुष्य अवघ ३७ वर्षे असूनही एकूण चित्रपट ७२. तिच्या सौंदर्या ची कीर्ती जागतिक स्तरावर पोहोचली होती आणि एक बहूमान म्हणून तिच्यावर त्याकाळचं सुप्रसिद्ध अमेरिकन मॅगझीन Theater Art मध्ये १९५२ साली "THE BIGGEST STAR IN THE WORLD AND SHE IS NOT IN BEVERLY HILLS" या शिर्षकाखाली लेख सुद्धा प्रसिद्ध झाला होता". त्यात पूर्ण पानभर फोटो देखील छापून आला होता. 


तिच्या  चेहऱ्यावर वयाच्या ९ व्या वर्षी १९४२ ला पहिल्यांदा रंग लागला आणि चित्रपट होता "बसंत" . तीच अप्रतिम आणि स्वर्गीय सौंदर्य आजही अनेकांना मुग्ध करत. तिच्या सौंदर्यामूळे तिच्या नावावर चित्रपट निघून त्यात काम करण्याच भाग्य तीला मिळाल आणि चित्रपट होता "मधुबाला" साल १९५०ं. सहअभिनेता अभिनय सम्राट दिलीपकूमार बरोबर असलेल्या तीच्या प्रमसंबंधाचा प्रवास निकाहाच्या चर्चेपर्यंत गेला खरा पण या प्रेमसंबंधात नया दौर चित्रपटासंदर्भातील एका कोर्ट केसमूळे आलेला दूरावा दोघांच्याही दूराभिमानामळे सांधू शकला नाही आणि ती एक शोकांतिका ठरली. तीच्या अद्वितीय सौंदर्यामूळे हॉलीवूड मध्ये होऊ घातलेला प्रवेश वडील अताऊल्लाखान यांच्या नकारामूळे प्रत्यक्षात येऊ शकला नाही. १९६० मधे तीच किशोरदांशी लग्न झालं पण हा संसार फक्त ९ वर्षच टिकला. 
तीचा पहिला चित्रपट १९४२ बसंत आणि शेवटचा तीच्या मृत्युपश्चात १९७१ मध्ये प्रदर्शित झालेला पण १९५० साली चित्रीत झालेला ज्वाला आणि ही अप्सरा २३ फेब्रुवारी १९६९ या दिवशी एका दूर्धर आजारामूळे वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी भूलोकावरून ईंद्रलोकी प्रस्थान करती झाली. 

शिरीष कणेकरांच्या शब्दांत तीला आदरांजली 
"या अप्सरेच सौंदर्य कोमेजण्याआधीच बहुतेक ईंद्राने तिला स्वर्गात परत बोलावले असावे"
..................
आभार : विकिपिडीया 
शब्दांकन व संकलन : प्रसन्न आठवले

Comments

  1. चांगली माहीती.
    हे दैवलोकीच सौंदर्यच अवघ्या 36 वर्षाच्या कालावधीत सा-या हिंदुस्तानावर पसरल आणि आजतागायत रसीकांच्या मनात राज्य करतय.

    ReplyDelete
  2. चांगली माहीती.
    हे दैवलोकीच सौंदर्यच अवघ्या 36 वर्षाच्या कालावधीत सा-या हिंदुस्तानावर पसरल आणि आजतागायत रसीकांच्या मनात राज्य करतय.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...