Skip to main content

अभिनय सम्राट - शोकांतिकांचा बादशहा



अभिनय सम्राट  -  शोकांतिकांचा बादशहा 



अभिनयाच्या क्षेत्रातील सर्व पदाक्रांत करुन उरलेला. ज्याकाळी गाणं म्हणजे अभिनय आणि गायक तोच नट अशी दुय्यम स्थिती असताना त्याने प्रवेश करून अभिनयाच्या व्याख्या स्वहस्ते लिहिल्या. स्वतच्या पडद्यावरील वावराने आणि सहजसुंदर अभिनयाने ज्याने अभिनयाची नव नवीन परीमाण जन्माला घातली . एका चाकोरीबद्ध आणि नाटकी संवाद फेकीच्याकाळात प्रवेश करून हिंदी चित्रपट सृष्टीला काळाच्या पुढे ज्याने नेल. ८ वेळा फिल्म फेअर अॅवॉर्ड जिंकलेला एकमेव अभिनेता. शोकांतिकांचा बादशहा म्हणजेच Tragedy King या किताबाचा जन्मच याच्या साठी झाला प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक सत्यजीत रे ज्याला " an ultimate method actor " अस संबोधतात. 

जो भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनयाच्या क्षेत्रातील पहिला शब्द आहे आणि राहिल . आपल्या सुदृढ सशक्त पण तरीही संयत अभिनयाने व्यक्तिरेखा साक्षात जिवंत करणारा असा हा भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनयाचा अनभिषीक्त सम्राट म्हणजेच सदाबहार दिलीपकूमार उर्फ युसुफखान.... 

क्रमशः


शब्दांकन व संकलन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...