बाप्पाच्या स्वागतानिमित्त लिहिलेल खास कवन :
गौरीनंदना विद्याधिशा स्वागत करण्या सज्ज जाहलो
नमन करुनी आदिदेवा संकल्पासह सिद्ध जाहलो
तुझ्या स्वागता गूढयातोरणे
मंगलवादन सजे पताका
विघ्नाहरा तुज पाहूनी देवा
पाप हरे विश्वास साधका
नवभक्तिची परिमाणे रे कमी पड़ो हर्षित जाहलो
गौरीनंदना विद्याधिशा ....
बहुभोजने , मोदक करुनी
तुला तोषण्या सारे जमले
मखर सजवुनी दीप लावूनी
दर्शन घेण्या भक्तही सजले
वादयांच्या गजरात गर्जुनी आगमनास्तव आतुर झालो
गौरीनंदना विद्याधिशा ......
तुझा महिमा भक्ततारका
कृपा आम्हावर तुझी असुदे
प्रतिवर्षि उत्सव बहु करुनी
दर्शनमात्रे सूखे होऊदे
मंगलकारक तुझे आगमन भक्तिसेवना उत्सुक झालो
गौरीनंदना विद्याधिशा ....
कवन : प्रसन्न आठवले
२५/०८/२०१७
Comments
Post a Comment