तूला पहिले
तूला पहिले अन मना वाटले
तूझे चित्र डोळ्यापूढे मांडले
तूझी ओढ हि वाटते या मनाला
सूगंधित धुंदी तूझी या मनाला
तूझी वाट हि पाहते सांजवेळा
तूझे भास होती मला सर्ववेळा
तू यावे असे ऋतूराजा प्रमाणे
उशाशी तूझी याद उरे जागणे
तूझ्या पाहण्याने शहारून यावे
तरी पहाणे हे मना आवडावे
माझ्या मनाला तूझी ओढ का रे
तूझे पाहणे भासते गोड़ का रे
तू यावेस स्वप्नील वाटे वारुनी
मी राहे न माझी तूला पाहुनी
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment