Skip to main content

मराठी हनुमान चालीसा

मराठी हनुमान चालीसा

॥श्री गणेशाय नमः॥

ll श्रीरामस्तुती ll

आपदामप् हर्तारम् दातारम् सर्व संपदाम्॥ लोकाभीरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ॥
--------------------------------------------------------------------
ll श्रीहनुमान द्वादश नाम कवच ll

हनूमान, जनासोनूः, वायूपुत्रो, महाबलाः, रामेष्ठा, फाल्गूनशत:, इन्द्राक्षो, अमीत विक्रमः,
उदविक्रमणस्येव, सीताशोकविनाशकाः, लक्ष्मणप्राणदाताचं, दशग्रीवस्यदर्पाः॥
द्वादश इतानी नामानी कपींद्रस्य महात्मनः स्वापकाले पठेत् नित्यम् यात्राकाले विशेषत:॥
तस्य म्रुत्यु भयम् नास्ती सर्वत्र विजयी भवेतं॥
--------------------------------------------------------------------
ll मराठी हनुमान चालीसा। ll

ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll
बुद्धीहीन तन कलीरत हे मन स्वीकारून हे सत्य मी शरणी l
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

जय हनुमंत ज्ञानी गुणी वंदिती जय पंडितं त्रिलोक पूजिती l
रामदूता अतुलनिय बलधामी अंजनिपुत्रा  पवनसुत नामी l
उदयाचली  मधुर फल रवी  मानून लीला दाविसी जगती l
कांचन वर्ण विरागी वेषी कुंडल मंडित कुंचितं केषी ll १ll

ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

राम सुग्रीव ही मैत्री तू जमवी मिळवून दिधली राज्य पदवी l
रघुवीरांनी दिली  मुद्रिका जल उल्लंघुनि जासी तू लंका l
सूक्ष्मरूप धरी सीता शोधिसी विकटरूप धरी लंका जाळीसी l
भीमरूप तू असूरा मारुनी  रामकार्या सफल करिसी ll २ll

ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

माता सीता शोकाकुल ती  रघुवीरांचा शब्द तू नेसी l
सहस्त्र संकटे जरी या मार्गा प्रभू हे नेतील तडीस कार्या l
वानरसेना देसी चेतवून लंकेशाचा क्लेश वाढवून l
शोध शोधूनी शक्ती योजूनी युक्तीसह असुरांना ताडसी ll ३ll

ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

लक्ष्मण मूर्च्छितं दुःखी श्रीरामं संजीवनीसह वाचवी प्राण l
अस्त्र घेऊनी दोन्ही भ्राता वेचून असुरा नेती अस्ता l
अंती जरी रामबाण करी रावणवध सफल या भूवरी l
मोही न पडता रामा वचना लंका राज्या देसी विभीषणा ll ४ ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

सीताराम हे राज्या बसले हार देऊनी तुज गौरविले l
पाहुनी भक्ती जन नी श्रीपती साश्रूनयने धरा सजविती l
रामसीतेची सुंदर प्रतिमा त्वरित दाविसी आपुल्या हृदया l
रामचरित कर्णामृत गाऊनी तृप्त करिसी नाम अमृत पाजूनी ll ५ ll

ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

जगदऊद्धारक कार्य करण्या कठीण कार्या सुगम करण्या l
कलियुगी सुख हे जाता शरण महाराष्ट्री जन करिसी रक्षण l
रामद्वारी तू ठाकसी ऐसा ब्रम्हादिका धाक हा कैसा l
भूत पिशाच्च शाकिणी डाकिणी  भीती तुजला नाम ऐकुनी ll ६ ll

ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

वज्र तनू अन ध्वजा विराची गदाधरा तू मूर्त बळाची l
ईश्वरांश संपूर्ण पवित्रा केसरीपुत्र पावन गात्रा l
सनाकादिक ब्रम्हादी देवही शारद नारद आणि शेषही
यम कुबेर अभिमाने कवनी भजती तुजला तव कीर्ती गाऊनी ll ७ ll

ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

भरतासम मानूनी भ्राता हृदयी स्थान प्रभूंच्या तुजला l
साधूजना तू प्रेमे वंदिसी असुरांसाठी आसूड  होसी l
अष्टसिद्धीही  प्राप्त होती भक्तिमार्गी तुजला जे भजती
रामरसाचे अमृत पियुनि मृत्युंजय ते होती जगती ll ८ ll

ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

तू नाम भजनी श्रीराम रंजनी जन्म जन्मीचे दुःख भंजुनी l
यक्ष किन्नरे रघुवर दास शिवशंकर प्रभुचे दास l
चिंतनी हनुमंताला ठेवून हरती दोष पाप परिमार्जन l
ज्या ज्या स्थळी  राम संकीर्तन त्या त्या स्थळी मारुती नर्तन ll ९ ll

ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

श्रद्धेने गती साऱ्या साधती शुभफल येता  पापे जळती l
भक्तीने  तव गान करती मुक्ती मिळे त्या गौरी साक्षी l
तुलसीदास हनुमान चालीसा प्राकृत लिहिले  हीच गुरुकृपा l
योग्य असे जर रामसीता कृपा न्यून असे तर दोष हा माझा ll १० ll

ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll

मंगल आरती हनुमंताची सीता राम लक्ष्मण कृपेची ll
हा अंतरात्मा मिळुदे अनंता साधे अंता रे रे हनुमंता ll

॥जय श्रीराम॥

॥जय हनूमान ॥ ॥जय हनूमान ॥ ॥जय हनूमान ॥ ॥जय हनूमान ॥ ॥जय हनूमान ॥ ॥जय हनूमान ॥

© हनुमंत कृपेने कवन : प्रसन्न आठवले
चैत्र शुद्ध पौर्णिमा अर्थात हनुमान जयंती शालिवाहन शके १९४१
१९/०४/२०१९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...