मना भावले प्रीतीचे चांदणे
मनी भाव जे, तू मनी जाणणे
मना ....
कुठे शोधू मी, तू जीवा वेड लावी
मधाची जशी, ओढ भ्रमरास व्हावी
मना आवडे , लोचनी तुज पाहाणे
मना ....
तू गंधात , श्वासात , भासात येसी
तुझे स्वप्न, जागेपणी भास देती
उरी अंतरी प्रीत हि वाहणे
मना .....
कवी: प्रसन्न आठवले
२४/०५/२०१७
२०:११
Comments
Post a Comment