तुझ्याचसाठी
तुझ्याचसाठी जगते प्रिया रे
मनी माझिया हि प्रीत तुझी रे
तुझ्याचसाठी ...
हे बोलणे चांदणे जणू प्रिये ग
स्वप्नातले भासते जग प्रिये ग
हे बोलणे ...
तुला पाहिले मानसी मी सखे ग
तुझी मूर्त डोळ्यात माझ्या सखे ग
तुझे चालणे भासते हंसिणी ग
हे बोलणे .....
तू स्वप्नात, सत्यात, हृदयात, माझ्या
तुझे गीत झंकारते कानी माझ्या
तू जागेपणी भास दिसशी प्रिया रे
तुझाचसाठी ....
आता या मनाला कसे सांगणे ते
पुन्हा पाहुनी, फिरुनी पाहणे ते
हवे वाटते मीलनी चांदणे रे
तुझ्याचसाठी ...
हे बोलणे ....
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment