जगण्याचा अर्थ
मनाजोगतं मिळत नाही म्हणून रुसण्यात अर्थ नाही
मिळेल तेच स्वीकारण्यातसूद्धा कसलाच स्वार्थ नाही
कधीच काही मिळालं नाही म्हणून निराश होऊ नका
चंद्र हाती नाही आला म्हणून काजवाहि सोडू नका
उगाच काही जगत आहोत अस वाटून घेऊ नका
सुमार आयुष्य म्हणजे काटेच असं काही समजू नका
तूझे ते दुःख आहे दूसर्याचे ते सोप्पे असं नसत
आयुष्याभर प्रत्येकाला कधीच मध मिळत नसत
म्हणून आला प्रत्येत क्षण तूझाच समजून जग तू
मिळणार्या प्रत्येक संधीच सोन करून सोड तू
तूझा तूच आहेस आणि तूझच कर्म तूला फळेल
जे धान्य पेरशील तू तेच उगवून हाती मिळेल
म्हणून उगाच आधार तू नको शोधूस भलत्याचा
एक ध्येय एक विचार मार्ग नकोच पाळत्याचा
सुटतील सर्व कोडी उघडतील सर्व दार नक्की
तूझं कर्म कर तू फळ मिळेल देतो खात्री पक्की
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment