Skip to main content

Posts

Showing posts from July, 2017

सांज पावसाळी धुके फाटलेले

सांज पावसाळी धुके फाटलेले सांज पावसाळी धुके फाटलेले सर घेऊन आली उरी दाटलेले जसे शब्द थेंबातूनी मांडलेले तूला सांगणे जे मनी साठलेले पडे पान पानी मनातील भाव तू ला सांगणे का पडे नाही ठाव मनी काय  तू झीया नसे काही ठाव मनी वाटले की  तू झे हेच भाव  जसे पावसाळी तसे कुंद वाटे मनी भाव येती परी बोल आटे तू ला ऐकू येइ मनी प्रीत दाटे  मनी  बोल मी   धाडले मेघ   वाटे  जशी धार ती सांडते या धरेला तशी येसी  तू धावूनी या हाकेला  तूला  पाहुनी वर्षती मेघमाला      मनी आस ये घेऊनी स्वप्नमाला   कवी : प्रसन्न आठवले  १२/०७/२०१७ १०:२२

निर्माता

निर्माता  शब्दघन येतात  जूळूनी चिंतनी सामर्थ्य वाहे  मोजक्या शब्दात सांगे भाव ती जाई प्रवाहें  काव्य ते स्फुरते सृजनता  देणं आहे  त्या प्रभूची  स्वप्नवत वाटे अशी ही शक्ती जणू त्या शारदेची  का कूणाला या इथे मन मांडता येते सहजची  का  कू णी येथे  खेळतो शब्द तेही  सोंगटीवत  का  कू णी येथे झगडतो मांडण्या त्या भावनाही  का  कू णी येथे अजूनही बोलतो त्या माऊलीप्रत   हे असे आहे इथे अन बोलणे ते नाही राऊ  असूनही येथे सृजनता बोलणे नाही देव  हा  खेळ हा आहे तयाचा मानणे नाही कठीणहि  दृष्टीचा तो दोष आहे सांधण्याचा फक्त सूर हा  सुमनही आहेत येथे विविधरंगी विविधगंधी  जीवही आहेत येथे सृजनता ती नाही कैसी  ही दिशा या तारका हा चंद्र अन तो सूर्य हि  कोण गेले निर्मुनी ही  अद्भुता नाहीच कैसी  नेटके  तरी सांगणे मग जन्म तुमचा जाहला ना  कि तुम्ही त्याही गोष्टी  ठेवणे विश्वास नाही  रागदारी...