Skip to main content

Posts

Showing posts from March, 2017

अशीच व्हावी ........

अशीच व्हावी ........ अशीच व्हावी  या वळणावर, भेट हि सुंदर पत्रामधुनी  तळमळ पोचावी  तू जप्रत ती, सखये चित्रित शब्दांमधूनी  भावफुलांचा गंध शिंपडून, केली शाई लिहिण्यासाठी   वाचावे गुज वाटे तू हे, तुझिया स्वप्नील डोळ्यांमधुनी  अशीच व्हावी ........  पोचतील का भाव अनामिक, वाटे हूरहूर शब्द तोकडे  तू ज समजावू वाटे प्रीती, अलगद हिरव्या   पानांमधूनी  अशीच व्हावी ........ वारा हितगूज सांगे वाटे, सूर पोचविल सम्बोधीन  तू ज  अर्थ पोचविल का, मी शंकित, मनी  असे जो झूळूकीमधूनी  अशीच व्हावी ........ मेघ जाहले दूत एकदा, होतील का ते मला सहाय्यी  सर्व सार का अचूक नेतील, ओलाव्या श्रावणसरीमधूनी   अशीच व्हावी ........ यातील  कोणी काही करणे, संभव वाटे नच मनी किल्मिष  तूच येऊनि स्वये पुसावे, प्रेम अलौकिक नयनामधुनी  अशीच व्हावी ........ कवी : प्रसन्न आठवले 

तूला पहिले

तूला पहिले तूला पहिले अन मना वाटले तू झे चित्र डोळ्यापूढे मांडले  तू झी ओढ हि वाटते या मनाला सूगंधित धुंदी  तू झी या मनाला तू झी वाट हि पाहते सांजवेळा तू झे भास होती मला सर्ववेळा तू यावे असे ऋतूराजा प्रमाणे  उशाशी  तू झी याद  उरे   जागणे तू झ्या पाहण्याने शहारून यावे  तरी पहाणे हे मना आवडावे माझ्या मनाला तूझी ओढ का रे  तू झे पाहणे भासते गोड़ का रे तू यावेस स्वप्नील वाटे वारुनी मी राहे न माझी  तू ला पाहुनी कवी : प्रसन्न आठवले 

वंदन तूज माते

वंदन तूज माते त्रैलोक्याच्या स्वामीला जे चरण ईश्वरीते करितो वंदन तूज माते ।। भूमिवरती प्रत्यक्षातहि  त्रिदेव जणू  वसतीते  करितो वंदन  तू ज माते ।।  तू धारा नवनीची तूची  धरा मानवाची तू जननी परमाची तू सादर प्राणासी तू झ्या पुढे हे त्रिभुवनही मज खुजे  भासताहे   करितो वंदन  तू ज माते ।।  मायेचि तू प्रतिमा केवल  तव चरणावर हे गंगाजल तू जगताचा श्वास तया हे मानवजन पूजिते  करितो वंदन  तू ज माते ।।  तव प्रेमाला तोड़ नाही जगी होऊ कैसे त्या उतराई  जन्मोंजन्मी तुझ्या उदरी मज येणे होउदे  करितो वंदन  तू ज माते ।। कवी : प्रसन्न आठवले