अभिनय सम्राट - शोकांतिकांचा बादशहा अभिनयाच्या क्षेत्रातील सर्व पदाक्रांत करुन उरलेला. ज्याकाळी गाणं म्हणजे अभिनय आणि गायक तोच नट अशी दुय्यम स्थिती असताना त्याने प्रवेश करून अभिनयाच्या व्याख्या स्वहस्ते लिहिल्या. स्वतच्या पडद्यावरील वावराने आणि सहजसुंदर अभिनयाने ज्याने अभिनयाची नव नवीन परीमाण जन्माला घातली . एका चाकोरीबद्ध आणि नाटकी संवाद फेकीच्याकाळात प्रवेश करून हिंदी चित्रपट सृष्टीला काळाच्या पुढे ज्याने नेल. ८ वेळा फिल्म फेअर अॅवॉर्ड जिंकलेला एकमेव अभिनेता. शोकांतिकांचा बादशहा म्हणजेच Tragedy King या किताब ाचा जन्मच याच्या साठी झाला प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक सत्यजीत रे ज्याला " an ultimate method actor " अस संबोधतात. जो भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनयाच्या क्षेत्रातील पहिला शब्द आहे आणि राहिल . आपल्या सुदृढ सशक्त पण तरीही संयत अभिनयाने व्यक्तिरेखा साक्षात जिवंत करणारा असा हा भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनयाचा अनभिषीक्त सम्राट म्हणजेच सदाबहार दिलीपकूमार उर्फ युसुफखान .... क्रमशः शब्दांकन व संकलन : प्रसन्न आठवले