मना भावले प्रीतीचे चांदणे मनी भाव जे, तू मनी जाणणे मना .... कुठे शोधू मी, तू जीवा वेड लावी मधाची जशी, ओढ भ्रमरास व्हावी मना आवडे , लोचनी तुज पाहाणे मना .... तू गंधात , श्वासात , भासात येसी तुझे स्वप्न, जागेपणी भास देती उरी अंतरी प्रीत हि वाहणे मना ..... कवी: प्रसन्न आठवले २४/०५/२०१७ २०:११